Tuesday, 5 December 2023

अभाविप एक जमात

3rd angle
हां बराबर है आप विद्यार्थी परिषद से हैं ना !
हे वाक्य कानावर जेव्हा पडते याचा अर्थ एक तर तुम्ही सुधारणार नाही किंवा एका माळेचे मणी जे वरून खालून सारखेच 
अभाविप 75 वर्षाच्या निमित्ताने दिल्लीत दिनांक 7 8 9 10 रोजी डिसेंबर रोजी महा अधिवेशन होते त्यानिमित्ताने विद्यार्थी परिषदेचे पंचवीस वर्षे काम केलेले माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आता वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून काम करताना त्रयस्थपणे जे वाटतं  ते मांडण्याचा क्रमशा प्रयत्न करत आहे 
🌈🌈🌈🌈 भाग 1,🌈🌈🌈🌈

अभाविप एक जमात 
ABVP is a tribe 

शीर्षक वाचून कदाचित आश्चर्य वाटलं असेल परंतु गेल्या 75 वर्षात शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी/ऱ्या अग्रणी अशा विद्यार्थी संघटनेबरोबरच, कार्यकर्ता आधारित भारतातील प्रभावशाली, सामाजिक जन संघटन या अभाविपच्या सर्वमान्य ओळखीसोबतच अभाविपची आणखीन एक महत्त्वाची ओळख म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ABVP 
ही एक जमात (tribe) आहे असं अनेकांना वाटते. 

भारतामध्ये जो गिरी कंदामध्ये, दूर जंगलामध्ये वास्तव्य करतो त्या वनवासी, आदिवासी, जनजाती  समजाची ओळख व व्याख्या करताना पाच गोष्टी निश्चित केल्या आहेत 
त्या म्हणजे  
भौगोलिक अंतर 
2) विशिष्ट संस्कृती, बोलीभाषा 
3) परंपरा बरोबरीने रूढी गत न्याय व्यवस्था
4) सामाजिक व आर्थिक मागासलेपण आणि 
5) संकुचित स्वभाव 

ह्या वर्गीकरणाच्या आधाराने जो समुदाय ह्याचे काटेकोर पालन करतो त्याला tribes म्हणून गौरविले गेले आहे. समजात विशेष दर्जा दिला गेलेला आहे.

सामाजिक संघटन व संघ विचारधारेच्या दृष्टीने  विचार केला तर वरील पाचही बिंदू अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला म्हणजेच  ABVP ला लागू होतात त्यामुळे संघाच्या विचारधारेतील जवळजवळ शंभर एक संघटनांमध्ये अभाविप वेगळी जमात tribe म्हणून उठून दिसते वर्तमान परिप्रेक्षात जवळजवळ सर्वांनी हे मान्य ही केलेले आहे.

भौगोलिक दृष्ट्या अंतर 

ज्याप्रमाणे जनजाती समाज हा दूर जंगलामध्ये, दऱ्याखोऱ्यात वास्तव्य करतो. प्रगत समाजापासून भौगोलिक दृष्ट्या असमतोल अशा प्रदेशांमध्ये अथवा विकासापासून दूर अशा निश्चित केलेल्या शेड्युल एरियामध्ये तो राहतो त्याचप्रमाणे
अभाविपने सुरुवातीपासूनच म्हणजे 1948 च्या अंबाला अधिवेशनापासून ते 9 जुलै 1949 ला विधिवत पंजीकरण करताना आपले कार्यक्षेत्र हे शिक्षण क्षेत्र निवडले त्यात ही शाळेला प्राधान्य न   देता महाविद्यालय, विश्वविद्यालय निश्चित केले व आपल्या नावात विद्यार्थी ह्या केंद्रबिंदूचा समाविष्ट अखिल भारतीय स्वरूपात करून घेतला. या पार्श्वभूमीवर अन्य संघटनांचे कार्य क्षेत्र हे संपूर्ण समाज असते.

75 वर्षांच्या वाटचाली मध्ये आजही भौगोलिक दृष्ट्या विद्यार्थी परिषदेचे मुख्य कार्यक्षेत्र हे विश्वविद्यालय, महाविद्यालयच निश्चित आहे त्यावर आधारित शाखा, संपर्क केंद्र, विस्तार केंद्र व महाविद्यालय शाखा याची संघटनात्मक संरचना निर्माण झालेली आहे. जी आज हजारोंच्या संख्येने सर्व दूर पाहायला मिळतात.
विद्यार्थी हा फ्लोटिंग पोपुलेशन चा भाग असल्यामुळे दरवर्षी सदस्यता करणे.  दरवर्षी केल्या जाणाऱ्या सदस्यतेने ही  गेल्या काही वर्षात 50 लाखापर्यंत गवसनी घातलेली पाहायला मिळते.

विशिष्ट संस्कृती व बोलीभाषा

भारतामध्ये ज्यांना जनजाती सुचित समाविष्ट केलेले आहे त्यांची स्वतःची एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, परंपरा आणि बोलीभाषा आहे यामध्ये निसर्गपूजन अथवा सण, उत्सव, कार्यक्रम, पूजा अर्चना व जीवन ज्ञापन करताना त्यांच्या परंपरागत आखून दिलेल्या पद्धतीनेच केले जाते.
अभाविपने ही सुरुवातीपासूनच आपली सैद्धांतिक भूमिका, विचार व कार्यपद्धती, कार्यशैली राबविताना प्रत्यक्ष कार्यकर्ता व्यवहार त्यातून व्यक्ती निर्माणावर अधिक भर दिला.
विविध कार्यक्रम, प्रकल्प, अभियान, आंदोलन विद्यार्थ्याला प्रथम संपर्कात आणणे. त्यानंतर छोट्या मोठ्या जबाबदारी देत कामात सक्रिय करणे व त्यातून पुढे एक सामाजिक नेतृत्व प्रस्थापित करून आदर्श नागरिक घडावणे हे मूळ सूत्र ! 
मागे वळून पाहताना ह्या द्वारे विविध क्षेत्रात नेतृत्व करणारी कर्तृत्वान पिढी निर्माण झालेली दिसून येते. 
हे सारे घडून आले ते विशिष्ट संस्कृती म्हणजेच आपल्या अनोख्या कार्यपद्धती आणि त्या बोली भाषेतील शब्द अंगवळणी पडल्यामुळे, 
नेमकी आपली कार्यपद्धती आणि बोलीभाषा पुन्हा आठवूया 
“राष्ट्र पुनर्निर्माणाच्या व्यापक संदर्भात”, सामूहिकता, अनामिकता, परस्पारिकता, प्रथम पुरुषी विचार, मते अनेक निर्णय एक, सब चलेंगे साथ चलेंगे, 
ज्ञान-शील-एकता, स्वतः प्रति कठोर इतरां प्रति मृदू, बैठक, पूर्व योजना-पूर्ण योजना,  पाठपुरावा, विषय मुरवणे, प्रवास, प्रवासी कार्यकर्ते, संपर्क-संवाद, लॉंग रोप, चल चहा घ्यायचा का? हे केवळ शब्द राहिले नाहीत तर ते लाखो कार्यकर्त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनले. 

तत्व आणि व्यवहार एकरूप झाले. उक्ती आणि कृती यातील अंतर कमी झाले.
प्रत्येक tribes चा एक मुखीया, गावगुडा, पटेल, मुंडा असतो त्याच्यावर अनेकांची श्रद्धा भक्ती असते त्याच्या अनुषंगानेच नंतरचे नेतृत्व घडत असते त्याचप्रमाणे अभाविप जमातीचा मुखिया म्हणून प्रा यशवंतराव केळकरांना स्वीकारले गेले आणि त्यांच्यामार्फत

विकसित होत गेलेली कार्यपद्धती, बोलीभाषा, दाखले हे शाश्वतेचे रूप घेवून आज ही वर पासून खाल पर्यंत मंत्री, संघटन मंत्री, प्राध्यापक, प्रमुख कार्यकर्ता, वरिष्ठ कार्यकर्त्याच्या रूपात  खालपर्यंत झिरपत आहे.
                                .      ............2..........

No comments:

Post a Comment